महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या वाढती संख्या पाहता राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. नाशिक येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रत्यावर उतरून जनजागृती केली आहे. महत्वाचे म्हणजे, नागरिकांनी निर्बंधाचे पालन न केल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही काही नागरिक हलगर्जीपणाने वागत आहेत. यातच छगळ भुजबळ यांनी नाशिक येथील गर्दीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नाही. 'मी तुम्हाला 8 दिवसांची मुदत देत आहे. त्यानंतर कठोर पावले उचलली जातील. लॉकडाऊन संदर्भात 2 एप्रिल रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा-Lockdown In Parbhani: चिंताजनक! परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनला नागरिकांचा विरोध; दंडात्मक कारवाईलाही सामोरे जाण्याची दाखवली तयारी
ट्वीट-
#लॉकडाऊन टाळण्यासाठी #कोरोना च्या नियमांचे पालन करा
: पालकमंत्री @ChhaganCBhujbal
गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करुन नागरिकांशी साधला #संवाद #Nashik #COVID19 #StaySafe @InfoDivNashik pic.twitter.com/6dMiEi8mQV
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) March 26, 2021
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (25 मार्च) आता 1 लाख 59 हजार 893 वर पोहचली आहे. यापैकी एकूण 1 लाख 38 हजार 646 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 274 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर नाशिक येथे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.