महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय नेते मंडळींनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करत छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि प्रमुख नेते आहेत. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी नाशिक येथे झाला. त्यांनी मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे. तरुणपणी ते शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र सुरुवातीपासून त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.
राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या आहेत. (Akshay Kumar Controversy: अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चौकशीचे आदेश)
Ajit Pawar Tweet:
महाराष्ट्राचे लढाऊ, संघर्षशील नेतृत्व व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माझे सहकारी, मा. @ChhaganCBhujbal जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना! pic.twitter.com/eiDpDvsKIi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2020
Anil Deshmukh Tweet:
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (@NCPspeaks) जेष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जी (@ChhaganCBhujbal) आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा. pic.twitter.com/mesGNlVqKk
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 15, 2020
Supriya Sule:
राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @ChhaganCBhujbal pic.twitter.com/mfOtZlgxTz
— Supriya Sule (@supriya_sule) October 15, 2020
Aaditya Thackeray Tweet:
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 15, 2020
Varsha Gaikwad Tweet:
ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय श्री. छगन भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य मिळो, हीच सदिच्छा!@ChhaganCBhujbal pic.twitter.com/wg1eREysNn
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) October 15, 2020
शिवसेना पक्षातून छगन भूजबळ यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. मात्र 1991 साली त्यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेस केला. त्यानंतर NCP मध्येच छगन भुजबळांची राजकीय प्रगती झाली. NCP चे प्रमुख नेते असलेले छगन भूजबळ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले.