Firing (Photo Credits: Pixabay)

Mumbai Train Firing: मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन गोळीबार प्रकरणी (Mumbai-Jaipur Superfast Express Firing Case) आरोपी चेतन सिंह याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याच्यावर वरिष्ठ ASI टिका राम मीणा यांच्यासह चार जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे कर्तव्यावर असताना सरकारी शस्त्राचा वापर करुन त्याने ट्रेनमध्ये गोळीबार केला होता. ज्यात चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आरोपीची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. जी न्यायालयाने मान्य केली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वत्तात, आरोपीची कोठडी वाढवून देण्यात आली. मात्र, त्याच्या ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफ आणि नार्को-विश्लेषण चाचण्या करण्यासाठी तपास संस्थेला परवानगी नाकारण्यात आल्याचे म्हटले आहे. घटना घडली तेव्हा आरोपीसोबत कर्तव्यावर असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहिती (जबाब) नुसार, एक्सप्रेस रुळावरुन धावत असताना आपल्याला अस्वस्थ वाटत असून आपली प्रकृती ठिक नाही असे चेतन सिंह वरिष्ठांना सांगत होता. तसेच, आपल्याला याचक्षणी कर्तव्यातून सुट्टी दिली जावी, अशी मागणीही तो करत होता. मात्र, कर्तव्यावर असताना असे मधूनच सोडता येणार नाही. शिवाय ट्रेनचा अंतिम थांबाही अगदी जवळ आला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणाचेही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता असे सांगितले.

एनडीटीव्हीने आरपीएफ कॉन्स्टेबल घनश्याम आचार्य यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चेतन सिंह याच्या गोळीबारात मारले गेलेले वरिष्ठ ASI टिकाराम मीना - वातानुकूलित डब्यांमध्ये ड्युटीवर होते. त्याच ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेला आरोपी हा आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे वारंवार सांगत होता. मात्र, टिकाराम मीना हे आता केवळ दोन तासांचाच प्रवास शिल्लख राहिला आहे. त्यामुळे अंतिम स्टेशन जवळ आले असताना कर्तव्यावरुन (ड्युटी) अशी सुट्टी घेता येणार नाही असे सांगत त्याला समजावले. अनेकदा समजावूनही त्याने कोणाचे ऐकले नाही.

ट्विट

दरम्यान, मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस वैतरणा स्थानकावर येताच आरोपीने गोळीबार केला. ज्यात एएसआय मीना यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी धाव घेतली असता वरीष्ठ अधिकारी आणि इतर काही प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेले आढळून आले. दरम्यान, ट्रेन सकाळी 6 वाजता मीरा रोड स्टेशनजवळ (मुंबई उपनगरीय नेटवर्कवर) थांबली असता आरोपीने शस्त्रासह पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला पाटलाग करुन पकडले.