Mumbai FDA Notice: मुंबईत मॅकडोनाल्डसह 30 दुकानांना नोटीस, वाचा कारण

मुंबईतील मॅकडोनाल्डसह तब्बल 30 फास्ट फूड दुकानांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने मुंबईतील मॅकडोनाल्डसह 30 फास्टफूड दुकानांना नोटीस पाठवली आहे. अहमदनगर इथं मॅकडोनाल्डमधील बर्गर आणि नगेट्समध्ये चीझऐवजी ‘चीज ॲनालॉग्स’चा वापर करण्यात येत असल्याच उघडकीस आलं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील मॅकडोनाल्ड्सह अन्य फास्टफूड विक्रेत्या कंपन्यांच्या शाखांची तपासणी सुरू केली. (हेही वाचा - McDonald Cheese: बर्गर आणि नगेट्समध्ये डाल्डा सापडल्यानंतर मॅकडोनाल्डने घेतला हा मोठा निर्णय)

एफडीएने अहमदनगरमधील शहरातील केडगाव भागातील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटचा परवाना रद्द केला आहे. मॅकडोनाल्ड्सकडून विकल्या जाणाऱ्या बर्गर, नगेट्स अशा खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार चीजला पर्याय म्हणून दुय्यम दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मेनूकार्डमधून ‘चीज’ हा शब्दच हटवण्यात यावा, असंही सूचित करण्यात आलं आहे. चीजला पर्याय म्हणून वापरले जाणारे ‘चीज अ‍ॅनालॅाग’ हे चीजसारखेच दिसतात. त्यांची चव, स्पर्श आणि गुणवैशिष्ट्यंही चीजसारखीच असतात.

ऑक्टोबर 2023 मध्ये अहमदनगरमधील केडगाव येथील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटमधील पदार्थांची तपासणी करून या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. तब्बल आठ पदार्थांमध्ये चीजसदृश घटक वापरल्याचं सिद्ध झाल्यावर एफडीएने त्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली होती. मात्र याबाबत सांगितले की त्यांनी चीजसदृश्य पदार्थ वापरत असल्याचं नाकारलं आणि आम्हाला ग्राहकांना पुन्हा एकदा खात्री पटवून द्यायची आहे की आम्ही आमच्या सगळ्या पदार्थांत केवळ उत्तम दर्जाचं चीजच वापरतो, असं सांगितलं.