महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह लोकांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. कोव्हीड-19 च्या 1071 घटनांपैकी एकट्या महाराष्ट्रात 215 जणांचा समावेश आहे. मात्र सांगली (Sangli) जिल्ह्यातील एक कुटुंब राज्यातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या केंद्रस्थानी आहे. या कुटुंबात कोरोना व्हायरसचे तब्बल 25 रुग्ण आहेत, अशाप्रकारे एकाच कुटुंबातील हे 25 सदस्य आता बरेच तज्ञांचे केस स्टडी बनले आहेत. 23 मार्च रोजी सौदी अरेबियाहून परत आलेल्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली. त्यांची चाचणी सकारात्मक आल्यावर या विषाणूच्या वाढीच्या चक्राला सुरुवात झाली.
त्यानंतर एका आठवड्यातच, दोन वर्षांच्या मुलासह कुटुंबातील इतर 21 सदस्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. इस्लामपूर (Islampur) तालुक्यातील हे संपूर्ण कुटुंब एका छोट्याशा जागेत राहते. घरात कमी जागा असल्याने यांचा एकमेकांशी सतत शारीरिक संबंध येत गेला, ज्यामुळे हे लोक कमी कालावधीमध्ये संक्रमित झाले. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. कुटुंबातील हे सर्व सदस्य एकमेकांसाठी प्राथमिक संपर्कातून झालेला संसर्ग होता. मात्र कुटूंबाच्या दुय्यम संपर्कातील लोकांना याचा संसर्ग झालेला नाही, त्यामुळे सध्या तरी कम्युनिटी प्रसार होत नसल्याचे समोर येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जर कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह व्यक्ती घरात खोकल्यास त्याचे थेंब इतःस्थत पडतात ज्यामुळे इतरांना या विषाणूची लागण होण्याचा धोका वाढतो.’ मात्र हे सर्व सदस्य एकाच कुटुंबातील असल्याने हे विषाणू पसरण्याचा धोका कंट्रोल करण्यास मदत होऊ शकते. चौधरी यांनी पुढे सांगितले, 12 मार्च रोजी मुंबई विमानतळावर हे कुटुंब आले तेव्हा हातावर ठस्से मारण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. मात्र या चार सदस्यांनी इतरांपासून वेगळे राहणे गरजेचे होते.
(हेही वाचा: सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास, मोठी किंमत मोजावी लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार)
कोरोनाबाधित कुटुंब राहत असलेला शहरातील साडेतीन किलोमीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे. यात 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे, तर 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. या कुटुंबाच्या जवळच्या संपर्कांपैकी 325 जणांना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विलगीकरणात हलविण्यात आले आहे. सध्या सांगली येथे या 25 जणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे इस्लामपूर परिसरातील अनेकांनी स्वतःला सेल्स आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.