Representational Image (Photo Credits: PTI)

1 जुलैपासून नवा महिना सुरू होणार आहे. या नव्या महिन्याचं आर्थिक गणित मांडण्यापूर्वी या नव्या महिन्यातील बदल जाणून घ्या. बॅंकांच्या व्यवहारांपासून स्वयंपाकघरातील गॅसच्या किंमतीमध्ये नेमक्या कशा कशामध्ये बदल होणार आहे हे जाणून घ्या. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कोणत्या गोष्टी फायदेशीर आहे हे जाणून घ्या.

RTGS & NEFT व्यवहारांमध्ये बदल

RTGS आणि NEFT च्या माध्यमातून आता व्यवहार करणं सुकर होणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, डिजिटल व्यवहार अधिक फायदेशीर होणार आहेत. 1जुलैपासून NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर System Charges नाही; आरबीआय चे बॅंकांना आदेश

गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता

नव्या महिन्यात गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. अद्याप त्याची घोषणा झालेली नाही.

एसबीआय कर दर

1 जुलैपासून रेपो रेटवर SBI बॅंकेद्वारा दिला जाणारा गृहाकर्जाचा दर ठरवला जाणार आहे. त्यामुळे जसे रेपो रेटमध्ये बदल होतील त्यानुसार होम लोनचेही दर बदलणार आहेत.

बेस्ट बस

बेस्ट बसच्या एसी आणि नॉन एसी दरामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता लवकरच त्या दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार नव्या दरांप्रमाणे मुंबईकरांना स्वस्तामध्ये बेस्ट प्रवास घडणार आहे. बेस्ट प्रवाशांसाठी खुशखबर! भाडे आता 5 रुपये आकारणार

बॅंक खातेदारांना सुविधा

आरबीआय ने बेसिक सेव्हिंग अकाऊंटमध्ये बदल केले आहेत. आता खातेदारांना शून्य रूपये अकाऊंट बॅलंस असेल तरीही चेकबूक सह अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

यासोबतच व्याजदर, रेपो रेट यामध्ये बदल होणार आहेत. अनेक बचत योजनांमध्येही बदल होणार आहेत.