Photo credit: Pixabay

Weather Forecast For Tomorrow: येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची (Rain) शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्याचा हवामान अंदाज (Tomorrow's weather forecast) वर्तवताना हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

याशिवाय, पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तथापी, गेल्या 24 तासांत विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा - Potholes On Ram Path: पहिल्याच पावसात अयोध्यातील रामपथावर 13 खड्डे, 6 अभियंते निलंबित; गुजरातच्या कंपनीला पाठवण्यात आली नोटीस)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापी, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.