औरंगाबाद येथील विरोधी पक्षाला व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमकवल्याने 35 वर्षीय तरुणाची तलावारीने रविवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दोन पक्षातील वैमनस्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले आहे.
मोईन पठाण असं या तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री मोईन याने आपल्या विरोधी पक्षाला धमकवणारी एक पोस्ट व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पोस्ट केली होती. त्यामुळे विरोधी पक्षातील संतप्त झालेल्या 20 तरुणांनी मोईन पठाण राहत असलेल्या ठिकाणी पोहचले. तर मोईन पठाण फातिमानगर येथे असल्याचे कळल्याने त्या 20 जणांनी रागाच्या भरात मोईनवर तलावारीने वार केले. मात्र तेथे उपस्थित असलेला मोईनचा भाचा त्याला वाचण्यासाठी गेला, परंतु त्याला सुद्धा या तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी या दोघांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मोईनला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तर हत्येतील अन्य आरोपींनी पळ काढला असून पोलिसांकडून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईस असं पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.