Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवासकरत असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण मध्य रेल्वेच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. पुणे विभागातील सांगली-मिरज (Sangli- Miraj) सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामाकरता काही रेल्वे गाड्या रद्द तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर  एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.  (हेही वाचा -Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक)

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत  गाडी क्र. 22155 कलबुर्गी-कोल्हापूर  एक्स्प्रेस रद्द
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत  गाडी क्र 22156  कोल्हापूर-कलबुर्गी  एक्स्प्रेस रद्द
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत   गाडी क्र 11412  मिरज - परळी डेमू रद्द
  • 27 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत गाडी क्र 11411 परळी- मिरज डेमू रद्द.
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत पर्यंत  गाडी क्र 01546 मिरज - कुर्डुवाडी डेमू रद्द
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत पर्यंत  गाडी क्र 01545 कुर्डुवाडी - मिरज डेमू  रद्द.
  •  29 डिसेंबर, 1  आणि   5 जानेवारीला गाडी क्र 11404  कोल्हापूर - नागपूर  एक्स्प्रेस रद्द
  •  30 डिसेंबर, 2  आणि  6 जानेवारीला गाडी क्र 11403 नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द.
  •  29 डिसेंबर आणि  5 जानेवारीला  गाडी क्र 11045  कोल्हापूर-  धनबाद  एक्स्प्रेस रद्द
  •  1 जानेवारीला गाडी क्र 11046   धनबाद-कोल्हापूर  एक्स्प्रेस रद्द.
  •  28 डिसेंबर आणि 4 जानेवारीला गाडी क्र 16541  यशवंतपूर - पंढरपूर  एक्स्प्रेस रद्द
  •  29 डिसेंबर आणि 5 जानेवारीला गाडी क्र 16541 पंढरपूर - यशवंतपूर  एक्स्प्रेस रद्द