Pune Mega Block: पुणे लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक,लोकलच्या 12 फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे -लोणावळा (Pune And Lonavala) सेक्शन वर रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी मेगा ब्लॉक (Mega Block) होणार आहे. पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 21 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे, पुणे विभागाने दिली आहे. ब्लॉक कालावधीत पुणे - लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे, (हेही वाचा - Pune Local Megablock: पुणे ते लोणावळा लोकल दरम्यान मेगाब्लॉक, काही लोकल रद्द तर काही एक्सप्रेस गाड्या कॅन्सल)

या ब्लॉक दरम्यान लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील, तसेच लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

दरम्यान यावेळी गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येईल.