मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल गाड्या 45 मिनिटे उशिरा
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई:  मध्य रेल्वे  (Central Railway) मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे (Technical Snag) वाहतूक ठप्प झाली आहे. ज्यामुळे धीम्या गतीच्या ट्रॅक वरील लोकल गाड्यांची वाहतूक ही तब्बल 45 मिनिटे उशिराने होत असल्याचे समजत आहे. वारंवार होणाऱ्या बिघाडाचा घटनांमुळे प्रवासी नागरिकांनी संताप व नाराजीचा सूर धरलेला आहे. मध्य रेल्वेच्या कळवा (kalwa ) व मुंब्रा (Mumbra) स्थानकांच्या दरम्यान रुळावर काहीतरी बिघाड झाल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात येतेय मात्र याबाबत कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान नागरिकांनी शक्य असल्यास जलद गतीच्या मार्गावरून प्रवास करण्याची सूचना देण्यात येत आहे.