मुंबई-पुणे रेल्वेसेवा हळूहळू पुर्वपदावर, आज लांब पल्ल्यांच्या 2 एक्सप्रेस रद्द
Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत थैमान घातलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून थोडी विश्रांती घेतल्याने ठप्प झालेली मुंबई-पुणे रेल्वेसेवा (Mumbai-Pune Railway) आजपासून पूर्ववत सुरु झाली आहे. डेक्वन क्विन (Deccan Queen Express), सिंहगड (Sinhagad Express), इंटरसिटी (Intercity Express), इंद्रायणी (Indrayani Express) या गाड्यांसह अन्य रेल्वेगाड्याही नियोजित वेळेत धावतील असे रेल्वे ने स्पष्ट केले आहे. आज केवळ पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस आणि मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-मुंबई लोहमार्गावर कोसळलेली दरड आणि मुंबईतील जोरदार पावसामुळे मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक ठप्प झाले होते. 28 जुलै ला म्हणजेच रविवारी पुणे- मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रविवारी पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा मिळाला असून, कर्जत ते लोणावळा दरम्यान घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या सोडून अन्य गाड्या आज त्यांच्या नियोजित वेळेत धावणार आहेत.

हेही वाचा- Mumbai Pune Mega Block: 9 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुणे प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी ‘डेक्कन क्वीन’ला ठाणे, दादर स्थानकांत थांबा!

गेले 2 दिवस मुंबईतील मुसळधार पावसामुळे कोलमडलेली रेल्वेसेवा पूर्ववत सुरु झाली असली तरीही जर आज पुन्हा पावसाचा जोर अचानक वाढल्यास रेल्वेचे नियोजित वेळापत्रक पुन्हा बदलूही शकते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतय. तूर्तास तरी पाऊस थांबला असल्याने लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे आपल्या नियोजित वेळेत धावतील.

रविवारी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस आणि हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या.