Mumbai Pune Mega Block: 9 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुणे प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी ‘डेक्कन क्वीन’ला ठाणे, दादर स्थानकांत थांबा!
Representational Image (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये लोणावळा कर्जत दरम्यान रेल्वे मार्ग दुरूस्तीचे कामं हाती घेतल्याने आज (26 जुलै) पासून 9 ऑगस्ट पर्यंत मुंबई -पुणे दरम्यान मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या रेल्वेमार्गावरील प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी मुंबई-पुणे प्रवासादरम्यान ज्या रेल्वे सेवा नियमित धावणार आहेत त्यामध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचा विचार करता 'डेक्कन क्वीन' या रेल्वे गाडीला अप आणि डाऊन मार्गावर ठाणे, कर्जत, दादर या रेल्वे स्थानकामध्येथांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते पुणे दरम्यान तांत्रिक दुरुस्ती; सिंहगड तसेच प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद, अनेक ट्रेनच्या मार्गात बदल

कोणकोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले?

  • पुणे-भुसावळ रेल्वे मनमाड मार्गे चालवली जाईल.
  • पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द
  • नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंत
  • कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी या तिन्ही गाड्या पुण्यापर्यंत
  • पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द

पुणे मार्गे मुंबईला येणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यादेखील या काळात पुण्यापर्यंतच चालवल्या जाणार आहेत. कोल्हापूरकडून येणारी कोयना आणि सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतच धावणार आहे. या गाड्या मुंबईपर्यंत चालवली जाणार नाही. मात्र महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई धावणार आहे.