The Mumbai International Airport | (Photo Credits: PTI)

सीबीआय (CBI) कडून मुंबई एअरपोर्ट स्कॅममध्ये GVK Group चे अध्यक्ष डॉ. रेड्डी (Dr G V K Reddy) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड विरूद्ध केस दाखल करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्ट घोटाळ्यामध्ये जीवीके कंपनी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड वर 800 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले आहे. सीबीआय कडून AAI आणि जीवीके कंपनी सह 9 अन्य कंपन्यांच्या अधिकार्‍यांची नावं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL)यामध्ये एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI), GVK आणि काही फॉरेन गुंतवणूकदारांचा समावेश आहे. दरम्यान AAI ने 2006 साली केलेल्या करारानुसार, मुंबई एअरपोर्टच्या मॉडर्ननायझेशन, अपग्रेडेशन आणि ऑपरेशन, मेंटेनन्स याची जबाबदारी होती. करारामध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्न हे प्रथम AAI ला दिले जाईल. त्यानंतर उर्वरित रक्कम MIAL मॉर्डनॅझेशन, अपग्रेडेशन साठी वापरू शकतात.

ANI Tweet

सीबीआयकडून दाखल करण्यात FIR मध्ये GVK group ला त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि कर्मचार्‍यांना फायदा मिळवून दिल्याने AAI ला नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान MIAL मध्ये 50.5% हिस्सेदारी ही जीवीके कडे आहे तर एअरपोर्ट अथॉरिटीकडे 26% हिस्सेदारी आहे. दरम्यान सीबीअय कडून आता गैरव्यवहाराचा आरोप लावत 13 व्यक्ती आणि कंपनींना तसेच काही अनोळखी पब्लिक सर्व्हंट यांचा आरोपींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.