महाराष्ट्राचे राज्यपाल ( Maharashtra Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांच्याबद्दल 'खोट्या'”, 'मानहानीकारक'” बातम्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी वृत्त संकेतस्थळाविरुद्ध (News Website) तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सायबर पोलीस विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच, न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे समजते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रा दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हणण्यात आले आहे की, या न्यूज वेबपोर्टलने राज्यपालांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे आणि निराधार वृत्त प्रसारीत केले. ज्यानंतर हे वृत्त समाजमाध्यमांतून (सोशल मीडिया) प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाले. फॉरवर्ड केले गेले. दरम्यान, ज्या संकेतस्थळाने हे वृत्त प्रसारीत केले होते त्यात दावा करण्यात आला होता की, राज्यपाल कोश्यारी यांनी एका अभिनेत्री आणि मॉडेलला डेहराडूनला जाण्यासाठी विशेष पासची व्यवस्था केली होती. तसेच, या मॉडेलला मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी विमानाने डेहराडूनपर्यंत जाण्यासाठी मदत केली होती. (हेही वाचा, महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका- भगत सिंह कोश्यारी)
पीटीआय ट्विट
Case lodged against news website for publishing "false", "defamatory" news about Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari: Official
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2020
राजभवनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, संबंधित संकेतस्थळाने दिलेले वृत्त खोटे आणि निराधार होते. ज्यामुळे राज्यपालांची बदनामी झाली. पोलीस उपायुक्त (सायबर विभाग) विशाल ठाकुर यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी केली जाईल.