व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्याकडून चेहरे मोहरे चित्रप्रदर्शनाची चित्रफीत शोशल मीडियावर शेअर
Cartoonist Raj Thackeray |(Photo Credits: Facebook)

राज ठाकरे (Raj Thackeray) हे राजकीय नेता किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष होण्याआधीपासून एक व्यंगचित्रकार (Cartoonist) म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आगोदर व्यंगचित्रकार आहेत. त्यानंतर राजकीय नेता. राज ठाकरे यांच्या सोशल मीडिया टीमने व्यंगचित्रकार राज ठाकरे (Cartoonist Raj Thackeray) यांच्या पहिल्या व्यंगचित्र प्रदर्शनाची चित्रफीत सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'चेहरे मोहरे' (Chehre Mohre) या प्रदर्शनाची ही चित्रफीत आहे. यात व्यंगचित्रांसोबतच अर्कचित्रांचाही समावेश आहे. हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आल्याचे पाहायला मिळते.

सोशल मीडिया टीमने राज ठाकरे यांच्या ट्विटर, फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेल्या चित्रफितीसोबत एक पोस्टही शेअर केले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व. श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या श्री.राज ठाकरेंचं १९९९ सालचं 'चेहरे मोहरे' हे पहिलं प्रदर्शन म्हणजे दोन्ही गुरूंना दिलेली मानवंदना. त्या प्रदर्शनाची झलक दाखवणारी चित्रफीत''. (राज ठाकरे यांची व्यंगचित्र आणि त्याबाबतचे वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

चेहरे मोहरे या चित्रप्रदर्शनात राज ठाकरे यांनी रेखाटलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पाठमोरी आकृती, लता मंगेशकर, लालकृष्ण अडवाणी, अमिताभ बच्चन, मनोहर जोशी, एमएफ हुसेन यांची कॅरिकेचर्स लक्षवेधी आहेत.

राज ठाकरे फेसबुक पोस्ट

दरम्यान, या चित्रफितीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, चित्रकार एमएफ हुसेन, गाणसम्राज्ञी लता मंगेशकर, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अनिल कपूर यांच्यासह अनेक दिग्गज हे चित्रप्रदर्शन पाहायला आल्याचे दिसते.