iPhone | (Photo Credits: PixaBay)

काल (10 जुलै) अचानक मुंबई पोलिस (Mumbai Police)  नागरिकांना 140 या अंकांनी सुरू होणारा कॉल उचलू नका, तुमच्या बॅंक अकाऊंटमधून सारे पैसे जाऊन बॅलन्स शून्य होईल. असा मेसेज देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सामान्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांनी हा एका वाहिनीचा त्यांच्या कार्यक्रमासाठी जाहिरातीचा भाग असल्याचं सांगत घाबरू नका, पॅनिक होऊ नका असं आवाहन केलं आहे. दरम्यान त्यानंतर वाहिनीकडूनही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र सायबर सेलकडूनही (Maharashtra Cyber) नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे. असं सांगत सुरक्षेचे काही उपाय सांगण्यात आले आहेत.

दरम्यान 140 ने सुरू होणारे नंबर हे आपल्याकडे टेलिमार्केटिंग साठी असतात. या अंकांनी सुरू झालेला फोन कॉल आला तर घाबरून जाऊ नका. मात्र लक्षात ठेवा की हे क्रमांक किंवा अन्य कोणत्याही क्रमांकावर तुम्ही ओटीपीसह तुमची खाजगी माहिती ज्यामध्ये बॅंक डिटेल्सचा समावेश असेल अशी माहिती देऊ नका. डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये किंवा कळत नकळत दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकाकडून ट्वीटरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. Undekhi च्या प्रमोशनसाठी Sony Liv कडून येणाऱ्या 'त्या' Calls बाबत मुंबई पोलिसांनी घेतली दखल; त्वरित असे कॉल्स बंद करण्याचा आदेश.

महाराष्ट्र सायबर ट्वीट

140 फोन कॉल घेऊ नका व्हायरल क्लिप मध्ये मुंबई पोलिसांच्या गणेशात असलेल्या व्यक्ती होत्या तसेच त्यामध्ये कुठेही ही क्लिप मालिकेच्या जाहिरातीसाठी वापरली जात असल्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य लोकांनी चटकन त्यावर विश्वास ठेवला आणि भीतीपोटी शेअर देखील केला. मात्र त्यामधून घबराट पसरल्याने काल रात्रीपासूनच ते सारे कॉल्स बंद केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्वीट करत जनतेला दिली आहे.