 
                                                                 नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. तर याचे पडसाद महाराष्ट्रात ही उमटले असून परभणी येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या प्रकरणी 50 जणांना अद्याप पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक अली खान यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर खान यांनी पळ काढला आहे.
परभणी येथे या काद्याला विरोधत करत हिंसाचाराची भुमिका आंदोलकांनी घेतली. यामध्ये सरकारी मालमत्तेची नासधूस, दंगल घडवणे किंवा दगड फेकणे या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात ज्यांनी कायदा हाती घेतला आहे त्यांच्या विरोधात कारवाई होणारच असे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले आहे. परभणी येथील काही भागात बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याची मागणी करण्यास आंदोलकांनी सुरुवात केली. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सर्व प्रकारादरम्यान आंदोलकांनी गाड्या फोडल्या आणि पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.(CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी)
तर हिंगोलीत सुद्धा दगड फेकीमध्ये 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 20 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बीड येथे सुद्धा आंदोलनाने हिंसक वळण घेत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासोबत दगडफेक केली. या ठिकाणहून 103 जणांना अटक आणि 103 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
