Students | Representational Image (Photo Credits: Getty Images)

कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होत आहे. काल (15 जून) पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. मात्र कोरोनाच्या सावटाखाली असल्याने राज्य सरकार, केंद्र सरकारने अद्याप शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय अजून राखून ठेवला आहे. सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलिस दल आघाडीवर येऊन लढत आहे. अशामध्ये महाराष्ट्र पोलिस दलाच्या कर्मचार्‍यांसाठी BYJU’S या लोकप्रिय लर्निंग अ‍ॅपने विशेष सेवा खुली केली आहे. पोलिस कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता म्हणून पोलिस दलात कार्यरत पाल्यांना मोफत कोर्स खुले करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलाकडूनही या उपक्रमाचं स्वागत केले जात आहे.

BYJU’S च्या अ‍ॅपवर आता महाराष्ट्रभरातील सार्‍या वर्गातील सुमारे 1 लाख मुलं मोफत ऑनलाईन क्लास, BYJU’Sच्या शिक्षकांकडून लाईव्ह सेशन्स, सराव परीक्षा आणि अनेक टीप्स यांचा मोफत उपभोग घेऊ शकणार आहेत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हांला हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करून या उपक्रमाचा फायदा घेऊ शकणार आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी मानले आभार

दरम्यान BYJU’S ने यापूर्वी दिल्लीमध्येही विद्यार्थ्यांसाठी असे मोफत कॉर्स खुले केले होते. आता महाराष्ट्रामध्ये कोरोनामुक्त असलेल्या भागात शाळा सुरू करण्यास काल मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. तर इतर भागात आया ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. UNESCO च्या रिपोर्टनुसार, 153 देशातील सुमारे 1200 मिलियन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोव्हिड 19 मुळे परिणाम झाला आहे.