प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Maharashtra: वाइन खरेदी करण्याच्या नव्या राज्य सरकारच्या धोरणाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. त्यानुसार आता लहान किरकोळ दुकानात सुद्धा वाइनची विक्री-खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु वाइन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला जर लहान किरकोळ दुकानातून वाइन खरेदी करायची असेल तर पिण्याचे परमिट आवश्यक असणार आहे.

वाइन खरेदी करुन तुम्ही घरी नेणार असाल तर तुम्हाला दुकानातून प्रथम 5 रुपयांचे परमिट विकत घ्यावे लागणार असल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच ज्या ग्राहकांनी आधीच वर्षभराचे किंवा कायमचे परमिट घेतले असेल त्यांना सहज वाइन खरेदी करता येणार आहे. मात्र दररोज वाइन खरेदी करणार असाल तर तुमच्याकडे परमिट असणे गरजेचे असणार आहे.(NMMC Notice To Societies: नवी मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निवासी सोसायट्यांना बजावली नोटीस, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई)

या व्यतिरिक्त माइल्ड बिअरसाठी पिण्याचे परमिट लागत नाही. परंतु 21 वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींना त्याचे सेवन करण्यास परवानगी आहे. पण अन्य दारुच्या सेवनासाठी परमिटची आवश्यकता आहे. मोठ्या मार्केटमध्ये वाइन संबंधित प्रोडक्ट्स किंवा द्राक्षांच्या शेतकऱ्यांना वॉक-इन पद्धतीने दुकानात किंवा 1 हजार स्वेअर फिट मीटरच्या सुपर मार्केटमध्ये विक्री करण्यासठी परवानगी असणार आहे. पण दुकानदारांना वाइनची विक्री करण्यासाठी प्रति वर्षासाठी 5 हजार रुपयांचा परवाना घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, सध्या सुपरमार्केटमध्ये दारुचा परवाना हा वाइन किंवा बिअर विक्री करण्यासाठी राज्यात लागतो. तसेच तो वेगळ्या पद्धतीने दाखवणे सुद्धा आवश्यक आहे. तर आता वाइन विक्री करण्यासाठी शाळा आणि धार्मिक स्थळांपासून दूर असावेत असे सांगण्यात आले आहे. राज्यात 70 वाइन तयार करणाऱ्या कंपन्या असून जवळजवळ या उद्योगात 10 हजार जणांचा समावेश आहे.