शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात; 7 जण जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

दोन बसमध्ये धडक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (Sion-Panvel Highway) कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलच्या समोर रविवारी दुपारी घडली. या अपघातात 7 प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका मीनी बसने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुस-या बसला मागून धडक जोरात धडक दिली. अपघातग्रस्त मीनी बस कर्नाटकहून प्रवाशांना घेऊन गुजरातकडे निघाली होती. तसेच हा अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कोरोना विषाणू संपूर्ण देशात हादरून सोडले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषीत केले होते. मात्र, कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल न दिसल्याने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, लॉकडाउनमुळे शहरात ठिकठिकणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी आपपल्या राज्यात परण्यासाठी गाड्यांची वाहतूक सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांनतर राज्यात गाड्यांची वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, अनेकजण रेल्वे, बस आणि इतर वाहनांच्या मदतीने आपल्या मूळ गावी पोहचत आहेत. हे देखील वाचा- Lockdown 4.0: देशात उद्यापासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात; महाराष्ट्रात अनेक नियमांना शिथिलता दिली जाण्याची शक्यता

शीव- पनवेल महामार्गावर घडेलल्या अपघातात स्थलांतरित मजुर असल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अपघातग्रस्त मीनी बस कर्नाटकहून प्रवाशांना घेऊन गुजरातकडे रवाना झाले असताना हा अपघात झाला आहे.