उस्मानाबाद (Osmanabad) मध्ये ऊरूसामध्ये वळू उधळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी पहाटे घडलेल्या घटनेमध्ये 14 भाविक जखमी झाले आहेत. या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या ऊरूसामध्ये ही घटना घडली आहे. 15 हजार भाविक उपस्थितांमध्ये ऊरूस पुढे जात होता. अचानक वळू उधळल्याने नागरिक भयभीत झाले आणि इथे तिथे पळू लागले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही पण काही नागरिक जखमी झाले.
पहा व्हिडिओ
महाराष्ट्र के उस्मानाबाद में ख्वाजा शमशोद्दीन गाजी के उर्स के दौरान घुसा सांड..
बीती रात करीब 3 बजे उर्स में घुसा था सांड..
उस्मानाबाद शहर में हजरत खाजा शमशोद्दीन गाजी का हो रहा है उर्स.
14 से 15 जख्मी हुए लोगों को इलाज के लिए जिला अस्पताल में भर्ती कराया गया है.. pic.twitter.com/TcbYr4El3J
— Vivek Gupta (@imvivekgupta) February 9, 2023
उस्मानाबाद मधील उरूस मध्ये जखमी भाविकांत सर्वाधिक 11 जण उस्मानाबादेतील असून दाेघे कर्नाटक राज्यातील तर एक जण परंडा येथील आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा 2-3 दिवस चालतो. सर्वधर्मीय भाविक यामध्ये सहभागी होतात. गुरूवारी देखील अशाच प्रकारे भाविक या ऊरूस मध्ये सहभागी झाले असता पहाटे अचानक वळू घुसला. वळूला घाबरून अनेकांची धावाधाव झाली. त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. कोविड 19 संकटामुळे मागील 2 वर्ष या ऊरूसका देखील ब्रेक लागला होता. यंदा तो 2 वर्षांनी आयोजित केल्यानंतर लोकांचाची मोठा प्रतिसाद होता.