Accident (PC - File Photo)

Buldhana bus Accident: बुलढाणा जिल्ह्यातून जात असताना बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. राजूर घाटात बस पलटी झाली. बस चालवताना ब्रेक फेल झाल्यामुळे  बस चालकांचा बसवरचा ताबा सुटला आणि बस घाटात जावून उलटी पलटी. या बसमध्ये 56 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती समोर आली आहे. मलकापुर ते बुलढाणा येथे ही बस प्रवास करत होती.  राजूर घाटात बस पलटी झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी लगेच मदतीचा हात पुढे केला.

बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बस वरिल नियत्रंण सुटलं आणि बसचा भीषण अपघात झाला. बसमधील कोणत्याही जीवितहानी झाली नाही. या बस अपघातामध्ये  शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. प्रवाशांना पलटी झालेल्या बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमधून 55 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. अपघातात 10 ते 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळत आहे.

मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती सध्या कळत आहे.बुलढाणा आगाराची बस क्रमांक एमएच 06 एस 8375 ही बस मलकापूर येथून बुलढाणा येथे जात असतांना या गाडीचा अपघात झाला.  सुदैवानं अद्याप अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.