मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्यासह इतर 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांपैकी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ (Malkapur Mayor Harish Rawal Arrested) यांच्यासह 6 जणांना अटक झाली आहे. ही कारवाई आज (11 नोव्हेंबर) सकाळी अटक करण्यात आली. तर बाकीचे संशयीत फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दारु पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीस मारहाण केलेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. अॅड. हरीश रावळ (Harish Rawal) यांच्यासोबत अटक झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर येथील एका व्यक्तीने दारु पिऊन अश्लील शिवीगाळ करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ आणि त्यांच्यासोबत इतर 25 जणांनी संबंधित व्यक्तीस बेदम मारहाण केली. दारु पिऊन शिवीगाळ करत घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव किरण साळुंके असे आहे. साळुखे हा 17 नोव्हेंबरच्या रात्री दारु पिऊन रावळ यांच्या घरासमोर आला. त्याने अश्लिल शिवीगाळकरत रावळ यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू, साळुंखे हा व्यक्ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे रीश रावळ , प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस लोकांनी लाठया काठ्यांनी किरण साळुंखे यांना बेदम मारहाण केली. (हेही वाचा, BJP MLA Prashant Bamb: भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, साखर कारखाना सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप)
दरम्यान, आपल्याला झालेल्या मारहाणीबद्दल किरण साळूंखे याने मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. किरण साळुखे यांनी दिलेल्या तक्रारी मलकापूर पोलिसांनी गुन्हा रजि. नं . 629/2020 कलम 324, 323, 143, 147, 149, 269, 270, 188, 504, 506 भारतीय दंड संहिता कलम 135 मुंबई पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरील कलमे आणि बेकायदेशीरपणे जमाव जमवणे या आरोपाखाली नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्यासह इतरांना आज (11 नोव्हेंबर) सकाळी अटक करण्यात आली.