भिवंडीत इमारत कोसळली (Photo Credits-ANI)

Building Collapse In Bhiwandi Update: भिवंडी येथील एक तीन मजली इमारत पहाटेच्या वेळेस कोसळ्याची घटना घडली. या इमारतीत जवळजवळ 40 च्या आसपास घर असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारत कोसळल्यानंतर काही नागरिक त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले तर सकाळपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. तर आता या दुर्घटनेत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप बचाव कार्य एनडीआरएफ कडून सुरुच आहे.(Mahad Building Collapse: रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली; 15 लोकांना वाचवण्यात यश, 200 हून अधिक लोक अडकल्याची भीती Video)

इमारत कोसळल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ही इमारत 43 वर्ष जुनी होती. त्याचसोबत कोसळलेली इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.(Mumbai: गोरेगाव येथील अविकसित इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 8 जण जखमी)

याआधी नालासोपारा येथील अचोले परिसरातील एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मात्र यामध्ये कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. ही इमारत पालिका प्रशासनाकडून यापूर्वीच धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या 4 मजली इमारतीमधील काही रहिवाशी यापूर्वीच इमारत सोडून इतरत्र राहण्यासाठी गेले होते. मात्र 5 कुटुंब इमारतीमध्ये होती. परंतू माती पडायला सुरूवात होताच रात्री ते सुरक्षित बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला.