BSE Sensex Update: कोरोना संकटातही मुंबई शेअर बाजारात तेजी; Sensex, Nifty वधारले
सेंसेक्स । फाईल फोटो

भारतासह जगभरात सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत असतानाही मुंबई शेअर शेअर बाजार हिरव्या निशाणावर उघडणं ही गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब आहे. आज (7 एप्रिल) सकाळी सेन्सेक्स 1300 हून अधिक अंकांनी वधारलेला पहायला आहे. त्यामुळे सकाळी सुरूवातीच्या काळात (9.54 वाजता) 28,902.56 पर्यंत सेन्सेक्सने भरारी मारलेली पहायला होती. तर निफ्टीनेदेखील 8300 च्या वर भरारी घेतली होती. काल महावीर जयंतीची सुट्टी असल्याने आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजार तेजीत पहायला मिळाला आहे. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रूपया 75.92 इतका पहायला मिळाला.

आईसीआईसीआई बैंक, इंडसइंड बैंक, एक्सिस बैंक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बैंक, वेदांता लिमिटेड, एम एंड एम, इंफोसिस, सन फार्मा और एचसीएल टेक यांचे शेअर्स आज तेजीत पहायला मिळाले आहेत.

ANI Tweet

कोरोना व्हायरसने सध्या अमेरिकेसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र जगभरातील बाजारपेठांमध्ये तेजी पहायला मिळाल्याने आता भारतातील मुंबई शेअर बाजारातही तेजी पहायला मिळाली आहे. काल अनेक जागतिक बाजरपेठांचा व्यवहार उसळी घेऊन बंद झाला होता. अमेरिकेमध्ये डाऊ जोंस 7.73% नी वधारला होता. नेस्डेक देखील 7.33% नी वधारल्याचं पहायला मिळालं होतं. यासोबत एसएंडपी 7.03%, चीनचं शांघाय कम्पोजिट 1.67% ने वधारलेलं पहायला मिळालं होतं.