Ganesh Galli (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून मुंबई 308 ठिकाणे मुंबई महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहे. या यादीमध्ये लालबागमधील गणेशोत्सवात प्रसिद्ध असणारा परिसर 'गणेश गल्ली' (Ganesh Galli) हा देखील कंटेनमेंट झोन म्हणून घषित करण्यात आला आहे. हा परिसरात खबरदारी म्हणून लोकांनी घराबाहेर पडून नये असा संदेश देण्यात आला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1399 वर पोहचला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई तसेच उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) काल 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. यापैकी 217 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिल रोजी 'मन की बात' या कार्यक्रमातून साधणार जनतेशी संवाद; जनतेला आपले मत नोंदवण्याचे केले आवाहन

याशिवाय देशात आज 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 8,447 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 273 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन 31 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला आपले मत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आपले मत नोंदवण्याकरिता जनतेला 1800-11-7800 करुन दिला आहे. याव्यतिरिक्त नागरिक MyGov आणि NaMo ऍपद्वारे आपले मत नोंदवू शकतात.