महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढत जाणारा प्रार्दुभाव लक्षात घेता राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले. मात्र यामुळे कोणत्याही शासकीया कामात अडथळा येऊ नये BMC मध्ये 1 मे पासून 100% कर्मचा-यांची उपस्थिती सक्तीची केली होती. मात्र Social Distancing पालन करण्याच्या उद्देशाने ही संख्या आता 25% कमी करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता BMC मध्ये केवळ 75% कर्मचा-यांची उपस्थिती ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच यात 55 वर्षीय कर्मचा-यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे.
ज्यानुसार, 55 वर्षांवरील सरकारी कर्मचा-यांना केवळ Work From Home वा ऑफिसेस मध्ये काम करण्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सरकारी वैद्यकीय विभागातील 55 वर्षांवरील डॉक्टर्स, परिचारिका ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असतील त्यांनी पुढील 2 आठवड्यांसाठी घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. Coronavirus: मुंबई महापालिकेने 55 वर्षांवरील कर्मचा-यांसाठी बनविली खास नियमावली, करावे लागणार 'या' नियमांचे पालन
Maharashtra: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) amends it's April 30 order to reduce employees' strength to 75% to maintain social distancing in its offices.
— ANI (@ANI) May 8, 2020
महाराष्ट्रात सद्य स्थितीत 17,974 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 694 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल दिवसभरात 1216 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यासोबत 207 नवे रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत 3301 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन चे पालन करण्यात यावे यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय, वैद्यकिय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.
सद्य स्थितीत भारतात एकूण 56,342 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 1886 वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 17 मे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.