बलात्कार केल्यानंतर विवाह केल्यास आरोपीचा गुन्हा रद्द- मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

मुंबईतील (Mumbai) एका जोडप्याचे नातेसंबंध होते. परंतु मुलाने फसवणूक आणि बलात्कार केल्याचा आरोप लगावत एफआयआर (FIR) दाखल केला होता. त्यानंतर या दोघांचे नातेसंबंध पुन्हा सुधारुन त्यांनी विवाह केला.मात्र आम्ही दोघे आनंदाने संसार करत असल्याचे महिलेने सांगितले आहे. त्यामुळे दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

पीडित महिलेने उच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यावर सुनावणी करत हे दोघे जण सुखाने संसार करल्याची बाब लक्षात घेऊन आरोपीवरील गुन्हा दाखल केला असल्याचे न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठाने रद्द केला आहे.(ठाणे: ढोकाळी येथील सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू; 5 जण जखमी)

खरतर बलात्कार प्रकरणी गुन्हा सहजासहजी रद्द केला जात नाही. मात्र महिलेने विवाह कादपत्रांसह अन्य प्रमाणपत्र सुद्धा न्यायालयात सादर केले. तसेच मी आता नवऱ्यासोबत खुश असल्याच्या साक्षीवरुन रद्द करण्यात आला असल्याने बलात्कार केल्यानंतर विवाह केल्यास आरोपीचा गुन्हा रद्द करण्यात आला आहे.