Indurikar Maharaj | (File Image)

Bombay High Court On Anti-sex Determination PCPNDT Act: लिंगनिश्चीतीवर आधारीत संदेश देत धार्मिक कार्यक्रमात प्रवचन देणे हा लिंगनिश्चिती विरोधी PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा निर्वाळा देत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्यावरील दाखल खटला रद्द करण्यास नकार दिला. पुत्रप्राप्ती म्हणजेच मुलगा जन्माला यावा यासाठी स्त्रीसंग हा सम तारखेस व्हावा, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले होते. दरम्यान, त्यांनी आपल्या कीर्तनात हा सल्लावजा वाक्य वापरताना काही पुरनांतील दाखलाही दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांचा दावा कायद्याच्या (PCPNDT Act) कसोटीवर कोर्टात मात्र टीकू शकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग आता मकळा झाला आहे.

न्यायमूर्ती किशोर संत यांनी निरीक्षण नोंदवत म्हटले की, गर्भधारणापूर्व आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्याच्या (पीसीपीएनडीटी कायदा) कलम 6 आणि 22 (1) अंतर्गत 'जाहिरात' ही केवळ निदान केंद्रापुरती मर्यादीत असू शकत नाही. त्याची कक्षा वढवायला हवी. निवृत्ती महाराज देशमुख यांच्याशी या प्रकरणातील आणखी माहिती घेण्यासाठी इते क्लिक करा.

निवृत्ती महाराज देशमुख यांनी 4 जानेवारी 2020 रोजी एक कीर्तनकार म्हणून जाहीर कार्यक्रमात बोलताना एका समूदयाला संबोधित केले. या वेळी त्यांनी कथितरित्या धार्मिक पुस्तकांचे तसेच आयुर्वेदावरील पुस्तकांमधील काही उतारे उद्धृत केले. त्याच दिवशी हे भाषण यूट्यूबवर अपलोड करण्यात आले. ज्यात सम तिथीस स्त्रीसंग झाल्यास मुलगा आणि विषम तिथीस झाल्यास मुलगी जन्माला येते, असे विधान केले. या विधानावरुच जोरदार वाद सुरु असून प्रकरण न्यायालयात गेले आहे. (हेही वाचा, http://cmsmarathi.letsly.in/maharashtra/nivrutti-maharaj-indurikarlikely-fir-bombay-high-courts-aurangabad-bench-470086.html)

ट्विट

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज? वाचा जसंच्या तसं

येथे दुहेरी अवतरण चिन्हात दिलेली विधाने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिर्डी येथील ओझर येथे कीर्तानावेळी उच्चारलेली असल्याचा दावा केला जातो आहे. ही विधाने करतानाचा इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर आणि युट्यूबवर व्हायरल झाला होता. लेटेस्टली मराठी या विधानाची अथवा व्हिडिओची पुष्टी करत नाही. केवळ वाचकांच्या माहितीसाठी ही विधाने येथे देत आहोत. लेटेस्टली मराठी या विधानाचे समर्थन अथवा विरोध करत नाही. ''स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला''