Mumbai: चालत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झाल्यास पीडित परिवाराला मिळणार नुकसान भरपाई, बॉम्बे हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठाने सुनावला निर्णय
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

Mumbai: बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे प्रवासासंबंधित एक महत्वपूर्ण आदेश जाहीर केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने असे म्हटले की, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतेवेळी जर एखादा प्रवासी पडून जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास पीडित परिवाराला नुकसाईन भरपाई मिळण्याचा हक्क आहे.(Land Scam Case: 1034 कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून प्रवीण राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

हायकोर्टाने रेल्वेच्या त्या दाव्याला फेटाळून लावले ज्यामध्ये असे म्हटले होते की, चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच हे एक क्रिमिनल निग्लिजेंसच्या श्रेणीत येते. हायकोर्टाने असे म्हटले की, प्रवाशाची चुक ही तोवर मानली जात नाही जो पर्यंत रेल्वे कडून हे सत्य केले जात नाही की प्रवाशाने चढताना किंवा उतराना आपल्या मेंदूचा वापर केला नाही. जेव्हा अशाप्रकारच्या घटना घडतात तेव्हा केस-टू-केस आधारावर त्या स्थितीवर लक्ष दिले पाहिलेज. ज्यामध्ये प्रवाशाला चालत्या ट्रेनमध्ये चढावे किंवा उतरावे लागले.

या प्रकरणी हायकोर्टाने सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांना नागपुरच्या सिंधी कॉलनीतील रहिवाशी शबीना कादिर अहमद शेख आणि तिच्या परिवाराला दोन आठवड्यात 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.(Theft: पाकीटात एटीएमचा पिन ठेवणे तीन प्रवाशांना पडले महागात, एकूण 1.38 लाखांचा घातला गंडा)

खरंतर कादिर अहमद शेख कटोल येथून ट्रेन पकडताना खाली पडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पीडित परिवार जेव्हा नुकसान भरपाई घेण्यासाठी रेल्वे ट्रिब्यूनलकडे गेली असता ती घटना चुकीची असल्याचे त्यांनी ठरविले. तसेच नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला. परिवाराने याच्या विरोधात हायकोर्टात आपली याचिका दाखल केली. त्यानुसार आता हायकोर्टाने यावर त्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.