शिवसेना नेते अनिल परबांवर (Anil Parab) टांगती तलवार असणारा कथित घोटाळा म्हणजे दापोलीतील साई रिसोर्ट घोटाळा (Sai Resort Scam). साई रिसोर्टच्या कारवाईबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडणार आहे. तरी प्रकरणातील मूळ तक्रारदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि इतर प्रतिवादी आपली भुमिका स्पष्ट करणार आहे. चार आठवड्यात आपली भुमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना दिले होते. म्हणून साई रिसोर्ट प्रकरणी (Dapoli Sai Resort) आज पार पडणारी सुनावणी अत्यंत महत्वपूर्ण सुनावणी असणार आहे. तरी या सुनावणीचा शिवसेना उध्दव ठाकरे गटावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना मोर्चेबांधणी करत आहे. त्यात जर अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली तर ते शिवसेनाला परवडण्यासारखं नसणार आहे. तरी इकडे दुसऱ्या बाजूला भाजप नेते किरीट सोमय्या न्यायालयापूढे काय बाजू मांडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
तरी किरीट सोमय्या यांनी कालच एक सुचक ट्विट (Tweet) करत याबाबत माहिती दिली होती. अनिल परबां विरोधात दापोली पोलिस स्टेशनमध्ये (Dapoli Police Station) आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी या तक्रारीत सदानंद कदम (Sadanand Kadam) हे मुख्य आरोपी तर अनिल परब (Anil Parab) यांनी सहआरोपी म्हणून जोडण्यात आले आहे. रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम (Sadanand Gangaram Kadam) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर हे वादग्रस्त आणि बेकायदेशीर रिसॉर्ट हे आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.
One More FIR against #AnilParab in #SaiResort Fraud
FIR 178 of 14/11/2022 of #Dapoli Police Station
Ratnagiri Collector/Circle Officer Complaint against Sadanand Kadam now (22 Nov)Anil Parab is added as Co-accused
Fraud Forgery Cheating by Kadam & Anil Parab @BJP4India pic.twitter.com/KWsus9rWtX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 23, 2022
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची हस्तक्षेप याचिका कोर्टानं स्वीकार करत त्यांनाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. तर आज किरीट सोमय्या न्यायालयात महत्वपूर्ण बाजू मांडणार आहे. तसेच आज या प्रकरणी अनिल परब (Anil Parab) काही पुरावे सादर करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.