मुंबई उच्च न्यायालयाने एक महिला आणि नवऱ्याने जेंडर प्रोटेक्शन अॅक्टचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तब्बल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हरियाणा येथील फिल गुड इंडिया या कंपनीची मालकीण नेहा गांधीर हिने खोट्या विनयभंगाचा आरोप लावल्या प्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे.
सपट आणि कंपनीच्या कफ सिरपच्या जुन्या ट्रेडमार्कवर आपला हक्का दाखवू पाहणारी नेहा गांधीर हिने या कंपनीच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर 2018 रोजी फिल गुड इंडिया कंपनीला कॉपिराईट्स अॅक्टनुसार काही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. त्यातसोबत कंपनीतील कारखान्यातून माल जप्त करण्यास सांगितला होता.तर 4 जानेवारी रोजी माल गाडीमध्ये टाकताना एक व्हिडिओ काढला गेला होता. त्यावेळी गांधीर या महिलेने कंपनीच्या प्रतिनिधींकडून फोन हिसकावून घेत तो व्हिडिओ डिलीट केला होता. तसेच महिलेने आपला विनयभंग केल्याचा खोटा खटला न्यायालयात दाखल केला होता.
तर न्यायालयाने या प्रकरणी संपूर्ण तपासणी निशी महिती मिळवून महिलेने खोटा खटला दाखल केल्याचे उघडकीस आले. तसेच महिलेने आपला गुन्हा कबूल केला असून तिला दंड ठोठावण्यात आला आहे.