Aditya Thackeray and Sanjay Dutt (Photo Credits: Facebook/Twitter)

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चौथी पिढी राजकारणात उतरली आहे. ठाकरे कुटूंबाचा आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा तसा फार जुना संबंध आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ठाकरे कुटूंबाचा राजकारणात प्रवेश झाला तिथपासून ते आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यंत ही परंपरा सुरुच आहे. त्यामुळे ठाकरे कुटूंबाचा राजकारणासोबत, कला,क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीशींही ऋणानुबंध कायम राहिले. त्याच्याच आधारावर अनेक बॉलिवूडकरांनी आदित्य ठाकरें सारख्या उमद्या आणि तरुण उमेदवाराला आपले समर्थन दिले आहे. यात संजय दत्त, सुनील शेट्टी (Sunil Shetty), दिनु मोरिया (Dino Morea), धर्मेश सर (Dharmesh Sir), जय भानुशाली, संकेत भोसले, हिंदुस्तानी भाऊ विकास फाटक यांनी खास व्हिडिओद्वारे वरळीतील जनतेला आदित्य ठाकरे यांना जिंकून देण्याचे आवाहन केले आहे.

या व्हिडिओमध्य संजय दत्तने (Sanjay Dutt) आदित्य ठाकरे ला आपला छोटा भाऊ असे संबोधले असून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच सुनील शेट्टी आदित्य यांचे अभिनंदन केले असून मी जिथे राहतो त्या वरळी भागातील उमेदवार आहेस याचा मला अभिमान आहे असे सांगितले. तसेच बेस्ट विनोदी कलाकार मिमिक्री आर्टिस्ट संकेत भोसले, सु्प्रसिद्ध डान्सर तसेच अभिनेता धर्मेशने त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया

अभिनेता दिनु मोरिया यानेही तुझ्यासारख्या नेत्याची या शहराला, देशाला गरज आहे किंबहुना तुझ्यासारखा तरुण उमदा नेता आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो असेही सांगितले आहे.

अभिनेता जय भानुशाली यानेही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत जनतेला आदित्य यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे तक हिंदुस्तानी भाऊ विकास फाटक यानेही आदित्य यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.