
Body of Missing Girl Found in Drain: मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील गोवंडी (Govandi) येथील शिवाजी नगर भागात राहणारी मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सापडला आहे. या मुलीची ओळख 15 वर्षीय झीनब मोहम्मद इकबाल शेख अशी झाली. शनिवारी संध्याकाळी उघड्या नाल्यात मुलीचा मृतदेह आढळून (Missing Girl Found in Drain) आला.
झीनबच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गुरुवारी रात्री 10 वाजता कचरा पिशवी टाकण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण त्यानंतर ती परतलीच नाही. यानंतर, चिंताग्रस्त वडील इक्बाल यांनी ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. काल संध्याकाळी, परिसरातील काही लोकांनी दुर्गा सेवा संघासमोरील नाल्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. तेव्हा स्थानिक रहिवाशांनी नाल्यातील कचरा काढून तो तपासला. यादरम्यान, त्यांना एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. (हेही वाचा - Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या)
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल -
दरम्यान, मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर याबाबत तात्काळ शिवाजी नगर पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. (वाचा - Couple Dies By Suicide In Front Of Train At Vikhroli Station: कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; विक्रोळी स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारून मारून जोडप्याने संपवली जीवनयात्रा)
मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. पोलीस या प्रकरणातील प्रत्येक बाजूने तपास करत आहेत आणि अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.