Mumbai: विरार (Virar) मधील अर्नाळा (Arnala) जेट्टीवरून बांधकाम साहित्य आणि 12 कामगार घेऊन जाणारी बोट रविवारी संध्याकाळी समुद्रात बुडाली. स्थानिक मच्छिमारांनी 11 कामगारांची सुटका केली, तर बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय मजुराचा मृतदेह मंगळवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.
जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोट बांधकाम साहित्य घेऊन जात होती. तर स्थानिकांनी सांगितले की बोट मध्य समुद्रात वाळूचे अवैध उत्खनन करत होती. ही बोट मध्य समुद्रातील दुसऱ्या जहाजाला धडकली आणि संध्याकाळी 7.30 च्या सुमारास उलटली. रविवारी रात्री किनाऱ्यावर परतलेल्या 11 कामगारांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांनी मदत केली. या अपघातानंतर संजय मुकणे नावाचा एक कामगार बेपत्ता होता. (हेही वाचा - Seepage of Water at Coastal Road Tunnel Viral Video: कोस्टल रोड च्या बोगद्यात पाणी गळतीचा व्हिडिओ वायरल; CM Eknath Shinde अधिकार्यांसह पोहचले पाहणीला (Watch Video))
वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले की, बोट उलटल्यानंतर लगेचच 11 जणांना वाचवण्यात आले. सोमवारी मुकणे यांचा शोध घेण्यात आला. मात्र, तो निष्फळ ठरला. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टर लावले आणि मुकणे यांचा मृतदेह पाण्यात सापडला. (हेही वाचा -PCMC Shocker: प्रेमाचा कहर! गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवलं, पिंपरी-चिंचवडमधील थरारक घटना)
प्राप्त माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या कामगारांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मुकणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अर्नाळा किल्ल्याजवळ ही बोट अवैध वाळू उत्खनन करत असताना मच्छिमारांनी अडवल्याचे स्थानिकांनी सांगितले. बोट दुसऱ्या जहाजाला धडकली आणि ती उलटली. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.