Boat Capsized in Ujani Dam: पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. उजनी धरणात(Ujani dam)झालेल्या दुर्घटनेत 6 मृतादेहांमध्ये तीन पुरुष, एक महिला, एक लहान मुलांचा समावेश (6 People Drown in Ujani Dam)आहे. 6 पैकी 5 जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. अजूनही एकाचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध घेणे (Search Operation) सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. बुधवारी या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. यात बोटीवर असलेली मोटारसायकल देखील पथकाला सापडली. (हेही वाचा:Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बोट उलटून मोठी दुर्घटना, 6 जण बुडाले; एनडीआरएफकडून शोध मोहिम सुरू )
मृतांची नावे:
उजनी धरण दुर्घटनेत बुडालेल्या व्यक्तींमध्ये गोकुळ जाधव (वय ३०), कोमल जाधव (वय २५) शुभम जाधव (वय दीड वर्ष), माही जाधव (वय ३) अनुराग अवघडे (वय ३५) गौरव डोंगरे (वय १६) यांचा समावेश आहे.
पोस्ट पहा:
utf-8">Ujani Dam Tragedy: Five Bodies Recovered As Boat Capsizes in Pune Dam, Search Operation Underway (See Pics)https://t.co/9eYEvVVg47#UjaniDamTragedy #BoatCapsize #Pune #UjaniDam— LatestLY (@latestly) May 23, 2024