बीएमसी (BMC) आता मुंबईला रेबिज फ्री (Rabies-Free) करण्याच्या तयारीमध्ये आहे. पालिकेने शहरातील सार्या भटक्या कुत्र्यांना लस देण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे लवकरच मुंबई शहर रेबिजमुक्त होण्याची चिन्हं आहेत. आज बीएमसीने त्यासाठीचा MoU साईन केला आहे. Mission Rabies आणि Worldwide Veterinary Services सोबत आता ते काम करणार आहेत.
MoU,नुसार लाखभर भटके कुत्रे दरवर्षी रेबिजची लस घेतात. असे TOI चे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर 20 भटक्या कुत्र्यांना आयडी कार्ड्स ही पालिकेकडून देण्यात आलेली आहेत. 2014 च्या निरीक्षणानुसार मुंबई शहरात सुमारे 95 हजार भटके कुत्रे आहेत. मागील 9-10 वर्षांत या आकड्यात अजून वाढ झालेली असेल. नक्की वाचा: Stray Dogs Aadhaar Card: BMC ची नवी मोहीम! आता भटक्या कुत्र्यांना मिळणार आधार कार्ड; QR कोडद्वारे होणार ओळख .
आता हा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून 1,64,000 झाली असल्याचा अंदाज आहे. MoU agreement, नंतर बीएमसीने हा भटक्या कुत्र्यांना लस देण्याचा प्रकल्प विचाराधीन असल्याचं म्हटलं होतं. आता मुंबई शहरातील ही कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहिम सप्टेंबर 2023 पासून सुरू केली जाईल असं सांगण्यात आले आहे.
बीएमसी आता जानेवारी 2024 मध्ये पुन्हा कुत्र्यांची मोजणी करणार आहे. त्या आकड्यांवर फेब्रुवारी 2024 पासून मोठ्या स्वरूपात ही लसीकरण मोहिम घेतली जातील. 'रेबिज फ्री' कॅम्पेन मध्ये बीएमसीचं लक्ष 10 दिवसांमध्ये लाखभर कुत्र्यांना लस देण्याचं आहे. नक्की वाचा: Rabies ची लागण झालेली मुलगी मृत्यूपूर्वी 40 जणांना चावली; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना .
मुंबई मध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. काही ठिकाणी कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत.