Narayan Rane’s Juhu Bungalow: नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर BMC कारवाई करण्याची शक्यता
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबई येथील बंगल्यावर बीएमसी (BMC) कारवाई करण्याची शक्यता आहे. मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या राणे यांच्या अधिश बंगल्यावर (Narayan Rane’s Juhu Bungalow) कारवाई करण्याबाबत मुंबई महापालीका हालचाल करत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या वृत्तानुसार महापालिकेचे आठ अधिकारी मोहीमेवर रवाना झाले आहेत. हे अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. दुसरीकडे राणे यांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमामावर पोलीसांचा बंदोबस्त तैनात झाल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

बीएमसीच्या हालचालिंबाबत लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, नारायण राणे हे सध्या जुहू येथील बंगल्यातच आहेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत महापालिकेने पाहणी केली होती. या पाहणीवेळी अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी करत काही कागदपत्रे तपासली. तसेच, बंगल्याचे मोजमापही केले होते. (हेही वाचा, Narayan Rane On State Government: दिशा सालियनच्या हत्येचं रहस्य उघड करणार असल्याने सुशांत सिंगची हत्या, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा म्हणाले...)

नारायण राणे यांच्या बंगल्यावर महापालिका कारवाई करणार किंवा नाही याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. तसेच, जर पालिकेने कारवाई केलीच तर ती कारवाई कोणत्या स्वरुपाची असू शकते याबाबतही अद्याप काही समजू शकले नाही. दरम्यान, मुंबई महापालिकेने केलेल्या पाहणीवरुन नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परीषदेत जोरदार टीका केली होती. माझ्या बंगल्याला नोटीस देता. मात्र, 'मातोश्री-2' बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिका का दुर्लक्ष करते? असा सवाल राणे यांनी उपस्थीत केला होता.