Coronavirus Outbreak दरम्यान मुंबईकरांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी BMC ने जारी केला हेल्पलाईन क्रमांक; थेट मानसिक आरोग्य तज्ञांकडून घ्या सल्ला
Call | Photo Credits: Pixabay.com

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता विळखा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. याकाळात नागरिकांना संचारबंदी असल्याने घरातचं बसणं, वर्क फ्रॉम करणं अनिवार्य आहे. त्यामुळे टेलिव्हिजन, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून होणार्‍या सतत कोरोना व्हायरसच्या बातम्यांच्या भडीमारामुळे अनेकांमध्ये अस्वस्थता, भीती वाढत आहे. म्हणूनच कोरोना व्हायरसचं गंभीर संकट जसं शरीराला घातक आहे तसंच ते मानसिक आरोग्यावरही परिणाम करत आहे. त्यामुळे घरबसल्या आता मुंबईकरांना मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी खास हेल्पलाईन क्रमांक मुंबई महानगर पालिकेने जारी केला आहे. पालिकेने उपलब्ध केलेल्या 1800-120-820-050 या क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या मनातले प्रश्न थेट विचारता येणार आहेत.

भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 236 असून 17 लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता निम्मी मुंबई पोलिस आणि पालिका प्रशासनाने सील केली आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्यांसोबतच डॉक्टर, पालिकेचा सफाई कर्मचारी, बेस्ट स्टाफ, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने आता नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. Good Morning Messages: सुप्रभात म्हणत सकारात्मकता, आनंद देणारे मराठमोळे Quotes, Wishes,Funny HD Images, GIF,WhatsApp Stickers शेअर करून मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या दिवसाची करा परफेक्ट सुरूवात

बीएमसी ट्वीट

मुंबई महानगर पालिकेच्या या मानसिक आरोग्य तज्ञांच्या हेल्पलाईन क्रमांकाचा सेलिब्रिटीकडून वापर करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. सध्या आजुबाजूला भीतीचं, एकटेपणाचं वातावरण आहे. म्हणूनच आपल्या भीतीवर मात करून कोरोनाचं संकट उलटून लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलच्या रात्री नागरिकांना आपाल्या घरात राहूनच रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावून आपल्या एकजुटीचं, सामर्थ्याचं उदाहरण जगाला दाखवावं असं आवाहन केलं आहे.