BMC Budget | X @BMC

मुंबई मध्ये आज महानगरपालिकेकडून 74,427.41 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 43 हजार कोटींची तरतूद विकासकामांसाठी करण्यात आली आहे. दरम्यान आज पालिकेचा अर्थसंकल्प शासकाच्या अखत्यारीत मांडण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी सध्या बीएमसीचा कारभार पाहत आहेत. दरम्यान आजच्या बजेट मध्ये कोणताही कर, शुल्क वाढ याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बजेट मध्ये कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते.

बीएमसीच्या बजेट मधील मोठ्या घोषणा

  • कुठलीही करवाढ, शुल्कवाढ नाही. कचरा गोळा करण्यावर पालिका विचाराधीन आहे त्यासाठी फीडबॅक घेतला जाईल नंतर निर्णयाची अंमलबजाववणी होईल मात्र तूर्तात कोणताही नवा कर किंवा शुल्क वाढ करण्यात आलेली नाही.
  • लंडन आयच्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारला जाणार आहे. दक्षिण मुंबई मध्ये काळा घोडा, रिगल सिनेमागृहाच्या आजुबाजूचा भाग विकसित केला जाणार
  • मुंबईत आकर्षण असलेल्या राणीच्या बागेत आता जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार असे परदेशी प्राणी येणार आहेत.
  • मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटींची तरतूद
  • मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी
  • मुंबई मध्ये ट्रेन नंतर वाहतूकीसाठी सोयीचा पर्याय म्हणजे बेस्ट बस आहे. मात्र बेस्ट उपक्रमाला बीएमसीने तग धरून राहण्यासाठी 1000 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.
  • बीएमसी च्या भागामध्ये 1333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. आता उरलेल्या भागात काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये होईल. टप्पा एक मधील 75% कामे आणि टप्पा दोन मधील 50% कामे जून 2025 पूर्वी पूर्ण करण्याची काम प्रस्तावित आहेत.
  • मुंबईतल्या महापालिका शाळांची स्थिती सुधारण्यासाठी मिशन 27 आणि मिशन संपूर्ण आहे. तर शिक्षण सुविधांसाठी 4000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेचं बजेट यंदा मागील बजेटच्या तुलनेत सुमारे 14% अधिक आहे.  मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये आहे.