मोबाईलवर (Mobile) रिल्स पाहणं, गेमिंगच्या नादी लागणं हे आज कालच्या मुलांचा नित्यक्रम बनला आहे. अनेकदा या नादामुळे अनेकांचा जीव देखील धोक्यात गेल्याचे पहायला मिळाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गेमच्या नादात मुलाने चक्क 14 व्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थ्याने उडी घेतली. (हेही वाचा - Sudden Death of Thane Man: भांडणानंतर हृदयविकाराचा झटका; तरुण उभ्या उभ्याच कोसळला; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू (Watch Video))
पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या मोबाईल गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, त्याला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क मिळाला. या मुलाने तो टास्क फॉलो केला यामध्येच या मुलाने आपला जीव गमावला. या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, एका कागदावर मुलाने गेममधील टास्क लिहल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच, त्याने गेमिंच्या झोनमध्ये स्वत:चं जीवन संपवल्याचं उघडकीस आलं आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. वेगवेगळे टास्क त्याला येऊ लागले, जे तो फॉलो करत गेला. हा बदल पाहून आई-वडील ही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन् तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, खोली आतून बंद होती. यानंतर खाली पडलेला मुलगा हा आपलाच असल्याचे त्याच्या पालकाला लागली.