भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते रोज नव्या भविष्यवाण्या करत आहेत, मात्र त्यांच्या भविष्यवाण्या नेहमी खोट्या ठरत आहेत. तसेच भाजपमधील नारायण राणे (Narayan Rane), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नाही. तसेच त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्यूत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही आहे. हेही वाचा MLC Polls 2021: विधान परिषदेच्या मुंबई जागेवर Rajhans Singh यांना BJP कडून मिळालेली आमदारकी पक्षाला आगामी बीएमसी निवडणूकीत उत्तर भारतीयांची मतं आकर्षित करायला मदत करणार?
भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात. मात्र त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही.
मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार म्हणणारे थकून गेले आहे. आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. आता नवीन ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहे.