Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात कर्ज बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Mohit Kamboj | (Photo Credit: FB )

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्ज बुडविल्याप्रकरणी कंबोज यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wings) ही कारवाई केली आहे. फसवणूक करणे आणि कट रचणे असा कंबोज यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांवरुन आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईस सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार कंबोज यांच्यावर मंगळवारी (31 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

इंडियन ओव्हरसिज बँकेकडून मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी ज्या कारणासाठी घेतले त्या कारणासाठी वापरलेच नाही. त्या ऐवजी त्यांनी ती रक्कम इतर ठिकाणी वळवली. वरुन कर्जही बुडवले, असा ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या वरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कंबोज यांच्यासोबतच या कंपनीचे संचालक असलेल्या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कंबोज यांनी आपल्यावरील सर्व ओरोप फेटाळून लावले आहेत. त्याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे. (हेही वाचा,Mohit Kamboj: सेनेच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मोहित कंबोज यांची विनंती )

ट्विट

ट्विट

ट्विट

मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्याविरोधात मुंबई पोलीसांनी एक एफआयआर दाखल केला आहे. ज्यात विविध आरोप करण्यात आले आहेत. जी कंपनी 2017 मध्ये बंद झाली त्याबाबत एक इश्यू काढून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. असे एफआयआर दाखल करुन जर माझा आवाज बंद करता येईल असे महाविकासआघाडीला वाटत असेल तर तसे अजिबातच नाही होणार. संजय राऊत किंवा नवाब मलिक यांचा हा बदला असेल तर मी न्यायालयात जाऊन माझी बाजू मांडेन. याबाबत मी कोर्टात कायदेशीर लढाई लडेण. पण घाबरणार नाही, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.