भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोमय्या सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याबाबत प्रथम माहितीचा अहवाल (FIR) नोंदवला गेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना रविवारी एक ईमेल प्राप्त झाला ज्यामध्ये, एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी केली.
ईमेलमध्ये म्हटले आहे की, सोमय्या यांचा एक व्हिडिओ लीक केला जाईल आणि तो सोशल मीडियावर प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना 50 लाख रुपये द्यावे लागतील.
सोमय्या यांच्या सचिवाने हा ईमेल ऍक्सेस केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ईमेल आयडीद्वारे ईमेल पाठवला गेला होता तो ऋषिकेश शुक्ला याच्या नावाचा होता. या प्रकरणाचा तपास आता नवघर पोलिसांच्या सायबर सेलकडून केला जात आहे. पोलीस अधिका-यांनी सांगितले की, त्यांनी ईमेल लोकेशनचा आयपी पत्ता (IP Address) शोधण्यास सुरुवात केली आहे आणि ईमेल पाठवणार्या गुन्हेगाराचा शोध घेण्यास ते सकारात्मक आहेत.
यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका मराठी चॅनलचे मुख्य संपादक आणि YouTuber यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Ajit Pawar On Muslim Quota: मुस्लिम कोट्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू; अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य)
काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीने सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा असल्याची माहिती दिली होती.