Eknath Khadse, Girish Mahajan | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे हे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज एकनाथ खडसे यांच्याच आहे की आणखी कुणाचा आहे? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. यावर या क्लिपनंतर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले आहे की, मी एकनाथ खडसे यांना दोष देणार नाही. कारण, त्यांचे वय वाढत आहे. इतके आजार वाढत असताना जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे मला वाटते आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तसेच लोकांना कोण काय आहे? हे सगळे माहिती आहे. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळाली नाही. याचबरोबर लोकांनी त्यांच्या मुलीला देखील मतदारसंघात नाकारलेले आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination in Thane: ठाण्यातील लसीकरण उद्या बंद; महापौर नरेश म्हस्के यांची माहिती

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपनंतर राजकारणात थिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच व्हायरल होणारी ऑडिओ खरेच एकनाथ खडसे यांचीच आहे की, अन्य कोणाची आहे? याबाबत अद्याप खुलासा झाला नाही.