सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता अधिक झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, अशा परिस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections 2020) तारखांची घोषणा केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बिहारमध्ये कोरोना संपलाय का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसे जाहीर करा, असे संजय राऊत म्हटले होते. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो, अशा आशयाचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. हे देखील वाचा- Bihar Assembly Elections 2020: जर मुद्दे संपले असतील तर मुंबई येथून पाठवले जातील, बिहार विधानसभा निवडणूकीवर संजय राऊत यांनी साधला निशणा
अतुल भातखळकर यांचे ट्विट-
सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. pic.twitter.com/iBQLi6fOgP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 26, 2020
बिहार विधानसभा निवडणूक 2020 तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर होणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडेल. तीनही टप्प्यांतील मतदानाचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.