मुंबई-औरंगाबाद प्रवासादरम्यान हवेत असलेले जेट एअरवेजचे विमान दुर्घटनाग्रस्त होता होता वाचले. वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. विमान लॅंडिंग करत असताना आकाशातील एका पक्षाची धडक विमानाला बसली. त्यामुळे विमान हवेत हेलकावले. विमानाला धडक दिलेला पक्षी पंख्यात अडकल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे.
तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे गेले काही तास विमान औरंगाबद विमानतळावरच अडकून पडले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे.
दरम्यान, तात्रिक बिघाड दूर झाल्यावर हेच विमान मुंबईसाठी पुन्हा उड्डण करणार असल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तसेच, सध्या औरंगाबादहुन मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आल्याचे समजते.