Bihar Assembly Election 2020: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ठरवली अचूक निशाण्याची वेळ?
Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

महाविकास आघाडी सरकार स्थापन करत महाराष्ट्रात सत्तेत आलेली शिवसेना ( Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) मध्येही पुन्हा एकदा नवी खेळी करण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक दोन्हीही पक्ष एकत्रच लढण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोन्ही नेत्यांमध्ये त्याबाबत प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही बैठक पूर्वनियोजीत होती असे सांगण्यात येत आहे. परंतू, काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर अल्पावदीतच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकयी वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी शिवसेना सज्ज झाली आहे. बिहारमध्ये शिवसेना 50 जागा लढवत आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. परंतू, शिवसेनेची अडचण अशी आहे की, बिहारमध्ये शिवसेनेला आपले नेहमीचे निवडणूक चिन्ह असलेल्या 'धनुष्यबाण' चित्रावर लढता येणार नाही. त्यावर जनता दल युनायटेडणे आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेसाठी निवडणूक आयोगाने 'बिस्किट' हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यावर शिवसेनेनेही आक्षेप नोंदवला आहे. आता पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवसेना 'बिस्किट' या चिन्हावर निवडणूक लढणार की, दुसरे चिन्ह घेणार. दरम्यान, राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणूकसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या 'बिस्कीट' या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेचा आक्षेप)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे अवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. त्यासोबतच आदर्श अचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. पहिला टप्पा 28 ऑक्टोबर, दुसरा , 3 नोव्हेंबर आणि चौधा 7 नोव्हेंबर. तिन्ही टप्प्यांतील मतमोजणी 10 ऑक्टोबर या एकाच दिवशी होणार आहे.