
Navi Mumbai Water Cut Update: देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी बुधवार आणि गुरुवारी हेटवणे लाईनवरील सर्व गावे तसेच द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा विभागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद (Water Cut) ठेवण्यात आला होता. बेलापूरमधील अघरोली पुलाजवळील मोरबे मुख्य पाणी पाईपलाईनवर महापालिका आवश्यक देखभालीचे काम करत असल्याने, गुरुवार, 10 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा बंद होता.
बुधवार, 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6:00 पासून ते गुरुवार, 10 एप्रिल 2025 सकाळी 6:00 पर्यंत (24 तास) यावेळेत शहरातील पाठीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. तथापी, 10 एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं सिडकोने म्हटले होते. आता उद्या म्हणजेच 11 एप्रिल रोजी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून अद्या महानगरपालिकेने यासंदर्भात अपडेट शेअर केलेले नाही. मात्र, हा पाणीपुरवठा केवळ 24 तास बंद ठेवण्यात येणार होता. त्यामुळे 24 तासांचा कालावधी उलटून गेल्याने नवी मुंबईकरांना उद्या सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! CIDCO ने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा, जाणून घ्या कोणते भाग होणार प्रभावित)
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे रुळांजवळ असलेल्या या पाईपलाईनला वारंवार गळती होत असल्याने, एनएमएमसीने त्याच्या बदलीचा पहिला टप्पा सुरू केला आहे. या कामासाठी 10 एप्रिल रोजी सकाळी 10:00 ते मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत 14 तासांसाठी मुख्य लाईनमधून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
🚰 पाणीपुरवठा बंदची सूचना 🚰
हेटवणे लाईनवरील सर्व गावे तसेच द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा विभागांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा बंद राहील:
बुधवार, ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:०० पासून ते गुरुवार, १० एप्रिल २०२५ सकाळी ६:०० पर्यंत (२४ तास) pic.twitter.com/EfOBCnfJGz
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) April 7, 2025
दरम्यान, यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोलीसह अनेक नोड्सवर परिणाम होईल. याव्यतिरिक्त, सिडको प्रशासित खारघर आणि कामोठे येथील रहिवाशांना तसेच मुख्य लाईनवरून थेट नळ कनेक्शन असलेल्यांनाही अडथळा निर्माण होईल. तथापी, नागरिकांनी आगाऊ पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि या काळात ते काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते.